मुंडेंचे पार्थिव परळीत दाखल, जनसागराचा बांध फुटला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंडेंचे पार्थिव परळीत दाखल, जनसागराचा बांध फुटला

Share This
परळी  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comभाजपचे ज्येष्ठ नेते, देशाचे ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे पार्थिव लातूरहून हेलिकॉप्टरने परळीत दाखल झाले आहे. येथे लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या अत्यंदर्शनासाठी जमले आहेत. अनेक केंद्रीय मंत्री, भाजपेच कार्यकर्ते आणि इतरही पक्षांचे नेते परळीत दाखल होत आहेत. शासकीय इतमामात मुंडेच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होणार आहेत. लोकांची प्रचंड गर्दी आणि दर्शनासाठी झुंबड उडाली आहे. यामुळे गोंधळ उडाला असून मुंडेच्या कन्या आमदार पंकजा पालवे यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले. 
मुंबई विमानतळाहून त्यांचे पार्थिव हवाई दलाच्या विशेष विमानाने लातूर विमानतळावर आणण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी प्रज्ञा, मुलगी आमदार पंकजा पालवे -मुंडे, डॉ. प्रीतम, यशश्री,  खासदार पुनम महाजन त्यांच्या पार्थिवासोबत होते.
 
भाजपचे ज्येष्ठ नेते राजीव प्रताप रुडी, खासदार किरीट सोमय्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड, भाजप नेते देवेंद्र फडणवीस लातूर विमानतळावर उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव लातूरमध्ये विमानतळाबाहेर त्यांच्या पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. जवळपास अर्धा तास येथे दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आल्यानंतर लष्कराच्या विशेष हेलिकॉप्टरने परळी येथे आणण्यात आले.

परळी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या आवारात त्यांच्या पार्थिवावार दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांची ज्येष्ठ मुलगी आणि आमदार पंकजा पालवे - मुंडे या त्यांना मुखाग्नी देणार आहेत. 

अंत्यसंस्काराला लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, रावसाहेब दानवे आदींसह राज्यातील नेते उपस्थित राहतील. सुरक्षेसाठी एसआरपीच्या दोन तुकड्या, अधिकार्‍यांसह अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात असेल. 
LIVE : लोकनेत्याचा अखेरचा प्रवास... मुंडेंचे पार्थिव परळीत दाखल, जनसागराचा बांध फुटलाLIVE : लोकनेत्याचा अखेरचा प्रवास... मुंडेंचे पार्थिव परळीत दाखल, जनसागराचा बांध फुटला

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages