कॅम्पावर कारवाई करण्यास पालिकेला अपयश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कॅम्पावर कारवाई करण्यास पालिकेला अपयश

Share This
campacl
पालिका अधिकारी दुसऱ्या दिवशीही हात हलवत परतले 
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेचे पथक कॅम्पकोलावरील करावाईसाठी गेल्यानंतर रहिवाशांनी मेन गेट बंद करून कर्मचाऱ्यांना अडवलं. विरोध करणाऱ्या रहिवाशांना अधिकाऱ्यांनी बराच वेळ समजवण्याचा प्रयत्न केला. पण रहिवाशांनी सोसायटीचं मेन गेट बंद करुन ठेवल्याने पालिकेच्या पथकला आज पुन्हा कारवाई न करताच परतावं लागलं. 

शुक्रवार पासून वरळीयेथील अनधिकृत कॅम्पकोलावर कारवाही करणार असे पालिकेने जाहीर केले होते परंतू रहिवाश्यांनी पालिकेला विरोध करत वसाहतीचे मुख्यगेट बंद करून ठेवल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांना कारवाही करता आली नव्हती. रहिवाश्यांची समजूत घालण्याचा पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रयत्न सुद्धा फसल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांना कोणतीही कारवाही न करताच परत फिरावे लागले होते. यावेळी पालिका उपायुक्त आनंद वागराळकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पालिका कारवाही करत आहे. कोणीही याला विरोध केल्यास त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी तसेच शासकीय कारवाहीमध्ये अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. 


कॅम्पाकोलातील बेकायदा घरांवर शुक्रवारी कारवाई करताना अडथळा आणणाऱ्या रहिवाशांविरुद्ध कलम 143 (बेकायदा जमाव) कलम 353 (सरकारी कामात अडथळा) नुसार शनिवारी सकाळी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रहिवाश्याविरोधात गुन्हा दाखल करूनही रहिवाश्यांनी शनिवारी सुद्धा पालिकेला कारवाही करू दिलेली नाही. यामुळे पालिकेने कॅम्पाकोलातील रहिवाश्यांना समजूत घालून कारवाही करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये दोन दिवस वय गेले आहेत. पालिकेने शुक्रवार ते रविवार या तीन दिवसामध्ये ३५ अनधिकृत माल्यांवरील ९२ अनधिकृत घरांचे ग्यास, वीज आणि पाणी कनेक्शन तोडून सोमवार पासून भिंती तोडण्याचे जाहीर केले होते. परंतू रहिवाश्यांनी विरोध केल्याने पालिकेला अद्याप कारवाही करता आलेली नाही. पालिकेने कॅम्पाकोलावर कारवाही करण्यासाठी वेगळा पोलिस फौजफाटा मागितलेला नसल्याने सुद्धा अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता पालिका अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवून कारवाही करण्याच्या विचार करत असल्याची माहिती पालीका सुत्रांकडून मिळाली आहे. 



Post Bottom Ad

JPN NEWS

Pages