कॉंग्रेस करणार राज्यव्यापी "रेल रोको' - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कॉंग्रेस करणार राज्यव्यापी "रेल रोको'

Share This
मुंबई - देशभरातून रेल्वे दरवाढ विरोधात संतापाचा उद्रेक झाल्यानंतरही केंद्राने दरवाढ मागे घेतली नसल्याने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. आज विनातिकीट प्रवास करत सविनय कायदेभंग केल्यानंतर बुधवार (ता. 25) ला राज्यव्यापी "रेल रोको‘ करण्याचा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिला आहे. 
केंद्राच्या रेल्वे दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसने तीव्र आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी मुंबई सीएसटी स्थानकावर माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने जोरदार निदर्शने केली. त्यानंतर माणिकराव ठाकरे यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी ठाणे स्थानकापर्यंत लोकलने विनातिकीट प्रवास करत दरवाढीच्या निषेधार्थ सविनय कायदेभंग आंदोलन केले. 

या वेळी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे चिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी आमदार बालाराम बच्चन, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदूरकर, वस्त्रोद्योगमंत्री नसीम खान, महिला बालकल्याणमंत्री श्रीमती वर्षा गायकवाड, खासदार हुसेन दलवाई, माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार कृपाशंकरसिंह, हरिभाऊ राठोड, राजहंस सिंग, अनंत गाडगीळ, अनीस अहमद उपस्थित होते. 

छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी), अंधेरी, ठाणे या रेल्वे स्थानकांत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आज संतप्त निदर्शने केली. या सविनय कायदेभंग आंदोलनानंतर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची दुपारी टिळक भवन या कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत बुधवारी (ता.25) राज्यव्यापी रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages