मंत्रालयातील शॉर्टसर्किटमुळे प्रचंड घबराट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2014

मंत्रालयातील शॉर्टसर्किटमुळे प्रचंड घबराट

मुंबई - मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीला बरोबर दोन वर्षे पूर्ण होत असतानाच आज दुपारी शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या किरकोळ आगीमुळे प्रचंड घराट पसरली. अग्निशामक दलाच्या गाड्या येण्याआधीच मंत्रालयातील आपत्कालीन यंत्रणेने ही आग आटोक्‍यात आणली. मात्र 21 जून 2012 रोजी लागलेल्या भीषण आगीच्या आठवणीने मंत्रालयातील कर्मचारी आणि सर्वसामान्य जनतेची पळापळ झाली. 
21 जून 2012 रोजी लागलेल्या आगीच्या आठवणी ताज्या असताना आज दुपारी मंत्रालयाच्या विस्तार इमारतीच्या महिल्या मजल्यावर शॉर्टसर्किट झाले. आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या दालनाजवळ असलेल्या स्विच बॉक्‍समध्ये दुपारी 3.45 वाजता शॉर्टसर्किट झाल्याने हा बॉक्‍स जळाला. या घटनेमुळे सामाजिक न्याय विभागात धूर पसरल्याने कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. मंत्रालयातील आपत्कालीन यंत्रणा आणि पोलिसांनी ही परिस्थिती कुशलतेने हाताळत सर्व कर्मचारी आणि अन्य लोकांना मंत्रालयाबाहेर काढले. 

या वेळी मंत्रालयात गृहमंत्री आर. आर. पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, परिवहनमंत्री मधुकर चव्हाण, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित उपस्थित होते. राजेंद्र गावित, हर्षवर्धन पाटील व मधुकर चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट देत कर्मचाऱ्यांनी घाबरू नये, असे आवाहन केले. मंत्री स्वतःच हजर असल्याने उपस्थित कर्मचारी व लोकांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण झाल्याने कोणताही गोंधळ झाला नाही. 

Post Bottom Ad

JPN NEWS