मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) लोकसभा निवडणुकीत एकहाती सत्ता काबीज करणार्या भारतीय जनता पार्टीने शिवसेनेवर कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने १४४ जागांची मागणी करत केंद्रात दोन राज्यमंत्री घेण्याची ऑफर शिवसेनेला देऊ केली आहे. मात्र सेना नेतृत्वाने ही अट अमान्य केली असल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेदेखील अधिक जागांची मागणी केली आहे. परिणामी, महायुतीमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच तेढ निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वतरुळात आहे.
गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपाची युती आहे. विधानसभेसाठी नेहमीच भाजपा ११७ जागा लढवते, तर शिवसेना १७१ जागा लढवत असते. मात्र या वेळी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नावाने भरघोस यश संपादन केल्यानंतर आता भाजपाचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे पक्षाची ताकद अधिक असल्याचा दावा करत भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीत २७ अधिकच्या जागांची मागणी केली आहे. त्या मोबदल्यात केंद्रात मंत्रिमंडळाच्या विस्तारात दोन राज्यमंत्री घेण्याची अटही ठेवली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोदी फॅक्टर महाराष्ट्रात राबविण्याची व्यूहरचना आखली आहे. महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्याच्या हेतूने भाजपा नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू तर केलीच आहे, पण त्याचबरोबर मित्रपक्ष शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा डाव आखला आहे.

शिवसेना आणि भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर नेत्यांची नुकतीच बैठक झाली होती. त्यामध्ये ही ऑफर ठेवण्यात आली. अर्थात त्या जागा नेमक्या कुठल्या आहेत आणि याबाबत अद्यापही कुठलीही माहिती मिळाली नसली तरी दोन्ही पक्षांमध्ये यावरून नवा पेच निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वतरुळात आहे. एवढेच नव्हे तर युतीत समाविष्ट झालेल्या रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोण आणि किती जागा दिल्या जाणार यावर दोन्ही पक्षांत मतभेद आहेत. भाजपाची ऑफर शिवसेना नेतृत्वाने नाकारली असल्याचे म्हटले जात आहे. त्यावरून भाजपाच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना प्रमोद महाजन यांच्यानंतर युतीमधील महत्त्वाचा दुवा मानला जात होता, परंतु त्यांच्या निधनामुळे दोन्ही पक्षांतील समंजस्य समन्वयकाचा अभाव निर्माण झाल्याचीही भावना उभय पक्षांत व्यक्त केली जात आहे.