मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) मुंबईतील रस्त्यांवर 36 हजार 154 भटकी मुले आणि रेल्वेच्या डब्यात व फलाटावर 905 भटक्या मुली राहत असल्याचे टाटा समाज विज्ञान संस्थेने केलेल्या पाहणीत आढळले आहे. त्यांच्या संरक्षण आणि विकासासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास राज्यमंत्री फौजिया खान यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
डॉ. दीपक सावंत आणि इतर दोन सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, टाटा समाज विज्ञान संस्थेने शंभर संघटनांच्या मदतीने नोव्हेंबर 2012 ते फेब्रुवारी 2013 या काळात ही पाहणी केली. या पाहणी अहवालानंतर राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गेल्या फेब्रुवारीत विशेष कृती दलाची स्थापना केली. विशेष कृती दलाच्या दोन बैठका झाल्या. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर आपण स्वतः या मुलांच्या प्रश्नासंबंधात बैठक घेणार असल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले. टाटा विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार या मुलांपैकी अठरा टक्के मुले आजारी, तर पंधरा टक्के अमली पदार्थांच्या आहारी गेली असल्याचे पाहणीत आढळले, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.