मुंबईत ६0 टक्के 'हायड्रंट' बंद असून ते जमिनीखाली दबलेले आहेत. आग लागल्यानंतर त्यांचे महत्त्व लक्षात घेता पुनरुज्जीवन करावे लागणार आहे. त्यांचे पुनरुज्जीवन करताना ते कालबद्ध करावे लागेल आणि यासाठी पालिकेचा नियोजन, जल यांच्यासह तीन-चार विभागांच्या अभियंत्यांशी चर्चा करणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी पत्रकारांना दिली. लोटसला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे २0 बंब आणि १२ टँकर्स घटनास्थळी पोहचले होते. यामुळे आग शमवताना पाण्याचा तुटवडा जाणवला नाही उलट पाणी शिल्लक राहिले, असे सांगून देशमुख म्हणाले, भविष्यात दोन अग्निशमन केंद्रांमध्ये चार किलोमीटरचे अंतर असणार आहे. ही योजना येत्या तीन वर्षांत अमलात येणार असून नव्या अग्निशमन केंद्रांसाठी पालिका जागांचा शोध घेत आहे. इंदिरा गोदीतील अग्निशमन केंद्रांची इमारत जर्जर झाली असून तिचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' करण्यात आले आहे. ही इमारत पाडून ती पुन्हा बांधावी लागेल, अशी माहिती त्यांनी दिली.
Post Top Ad
22 July 2014
Home
Unlabelled
मुंबईत ६0 टक्के 'हायड्रंट' बंद
मुंबईत ६0 टक्के 'हायड्रंट' बंद
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

