अग्निशमन दल ९0 मीटर उंचीची शिडी खरेदी करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अग्निशमन दल ९0 मीटर उंचीची शिडी खरेदी करणार

Share This
मुंबईतील साडेसहा हजार गगनचुंबी इमारतींचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी महापालिकेचे अग्निशमन दल ९0 मीटर उंचीची शिडी (हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म) खरेदी करणार आहे. यासाठी १९ कोटी १८ लाख रुपये खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येणार आहे. 
सध्या मुंबईत साडेसहा हजार उत्तुंग इमारती असल्यामुळे अशा इमारतींना आगी लागल्या तर पालिकेकडे केवळ ६८ मीटर उंचीची शिडी आहे. अग्निशमन दलाला ९0 मीटर उंचीच्या शिडीची आवश्यकता आहे. जगात मे. ब्रँटो स्कायलिफ्ट ओवाय एबी फिनलँड ही एकमेव कंपनी आहे आणि हीच कंपनी ९0 मीटर उंचीची शिडी बनवते. ही शिडी १९ कोटी १८ लाख रुपयांत खरेदी केली जाणार असून ही शिडी समुद्रामार्गे मुंबईत आणली जाणार आहे. ही शिडी अग्निशमन दलाच्या भायखळा मुख्यालयात ठेवण्यात येणार असून ती येथे आणल्यानंतर अग्निशमन जवानांना ही शिडी वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages