मुंबईमध्ये 20 टक्के पाणीकपात लागू करण्याच्या हालचालींना वेग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 July 2014

मुंबईमध्ये 20 टक्के पाणीकपात लागू करण्याच्या हालचालींना वेग

मुंबई - धरणांमध्ये महिनाभराचा पाणीसाठा शिल्लक असल्याने 20 टक्के पाणीकपात लागू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत तसा प्रस्ताव मांडण्यात येणार असून गुरुवारपासून कपात लागू होण्याची शक्‍यता आहे. 
पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 30 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कपातीचा निर्णय घेण्यासाठी आज (ता.30) आयुक्त सीताराम कुंटे यांच्या दालनात पाणी खात्याची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत 20 टक्के पाणीकपात लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. पाणीकपातीचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. त्यात गुरुवारपासून पाणीकपात लागू करण्याची शक्‍यता असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

Post Bottom Ad

JPN NEWS