रिपब्लिकन पक्षाला हव्यात 20 जागा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रिपब्लिकन पक्षाला हव्यात 20 जागा

Share This

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला जिंकण्याची शक्‍यता असलेल्या किमान 20 जागा शिवसेना-भाजपने द्याव्यात, अशी मागणी रविवारी (ता.27) झालेल्या पक्षाच्या बैठकीत करण्यात आली. सोमवारी (ता.28) महायुतीची जागावाटपासंदर्भात बैठक होत आहे. त्यापूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत राज्यातील 50 ते 60 जागांबाबत चर्चा करण्यात आली व त्यापैकी 20 जागांची मागणी महायुतीकडे करण्याचे ठरविण्यात आले. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे विजय मिळाला; मात्र विधानसभेसाठी केवळ या लाटेवर अवलंबून चालणार नाही, असा इशारा आठवलेंनी या वेळी दिला. रिपब्लिकन पक्षाच्या सोबतीशिवाय महायुतीची सत्ता राज्यात येणार नाही. त्यामुळे पक्षाला सत्तेत सन्मानजनक हिस्सा मिळावा. लोकसभा निवडणुकीप्रमाणे हरण्याची खात्री असलेल्या नव्हे; तर जिंकण्याची शक्‍यता असलेल्या जागा आम्हाला द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages