नवी दिल्ली : संरक्षण दलातील आत्महत्यांवर चिंता व्यक्त करताना संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत लष्कर, हवाई दल आणि नौदलात ५९७ कर्मचारी व अधिकार्यांनी आत्महत्या केल्या. याच काळात तब्बल १,३४९ जणांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचेही सरकारने मान्य केले. २00९ ते २0१३ या पाच वर्षांत लष्करातील ४९८, हवाई दलातील ८३ आणि नौदलातील १६ अशा एकूणच ५९७ जणांनी आत्महत्या केल्याची माहिती संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना दिली.
Post Top Ad
23 July 2014
Home
Unlabelled
संरक्षण दलात ५ वर्षांत ५९७ आत्महत्या
संरक्षण दलात ५ वर्षांत ५९७ आत्महत्या
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

