परळमधील जीर्ण जलवाहिन्या बदलणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

परळमधील जीर्ण जलवाहिन्या बदलणार

Share This
मुंबई - पाणीपुरवठ्यात सुधारणा होण्यासाठी परळ आणि लोअर परळ परिसरातील जीर्ण जलवाहिन्या बदलल्या जाणार आहेत. यासाठी 15 कोटी 33 लाखांचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. 

वडाळा येथील बरकत अली नाका, एस. एम. रोड वडाळा, सागर हॉटेल कोरबा मिठागर, मोतीलाल नगर, विजय नगर, शांती नगर, आर. जे. गायकवाड मार्ग वडाळा, शिवडी बंदर रस्ता, पेट्रोलियम गोदाम वडाळा, गं. द आंबेकर मार्ग या भागातल्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. विविध आकाराच्या या जलवाहिन्या आहेत. त्या बदलण्याची कामे प्राधान्याने हाती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी 15 कोटी 33 लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ई-टेंडरिंगच्या माध्यमातून या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. मेसर्स स्कायवे इन्फ्रा प्रोजेक्‍ट्‌स प्रा. लि. या कंपनीला हे काम देण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages