अपंग प्रवाशांना सोयीस्कररीत्या प्रवास करता यावा म्हणून रेल्वेत अपंगांसाठी राखीव डब्याची सोय करण्यात आली आहे. मात्र अपंग प्रवाशांपेक्षा सुदृढ प्रवासीच या राखीव डब्याचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे स्थानकातही अपंगांच्या डब्यातून प्रवास करणार्या ५१ सुदृढ प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलाने १५ जुलै ते १९ जुलै या कालावधीत कारवाईचा बडगा उचलला असल्याचे आरपीएफने सांगितले. रेल्वे सुरक्षा बलाने ५१ लोकांवर कारवाई केली आहे. विशेष बाब म्हणजे यात पुरुषांची संख्या जास्त असून बड्या बड्या कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या उच्च शिक्षित लोकांची संख्या जास्त असल्याचीही माहिती समोर आली आहे. अपंगांच्या डब्यात अपंग नसलेले प्रवासी सापडल्यास १२७५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले.
Post Top Ad
22 July 2014
Home
Unlabelled
अपंगांच्या डब्यातून प्रवास करणार्या सुदृढ प्रवाशांच्या संख्येत वाढ
अपंगांच्या डब्यातून प्रवास करणार्या सुदृढ प्रवाशांच्या संख्येत वाढ
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

