मुंबई - अंधेरीतील "लोटस‘ इमारतीची 21 व्या मजल्यावरील आग आटोक्यात आली. इतक्यात खालच्या मजल्यावरून आगीचा लोळ उसळला. तो भडका पाहून आम्ही श्वास रोखून धरले. त्यातच पाण्याचा पाईपही आगीत वितळला. अखेरीस दिशा मिळेल तिकडे धावत सुटलो. या मृत्यूच्या तांडवातून जिवंत बाहेर पडणे अवघड होते. प्रकाशाच्या दिशेने धावत सुटलो. 21 व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचारही मनात येऊन गेला, पण हिंमत करून एकमेकांना सांभाळत जखमी झालेल्या सहा जणांना आणि मृतावस्थेतील नितीन इवलेकर याला स्ट्रेचरवरून खाली आणले. हा दाहक अनुभव आहे मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांचा. "लोटस बिझनेस पार्क‘ इमारतीच्या 21 व्या मजल्यावर लागलेली आग जवानांनी आटोक्यात आणली होती. मात्र, अचानक 20 व्या मजल्यावरून आगीचा लोळ उसळला. हा भडका एवढा भयानक होता की जमिनीवर पाय ठेवणेही शक्य नव्हते. 35 जवान 21 व्या मजल्यावर अडकले. त्यातील 10 जवान इमारतीच्या गच्चीवर पोहचले. एकूण 35 जवान मृत्यूच्या दाढेत अडकले होते. वाट मिळेल तिकडे धावत होते.
दुसऱ्या बाजूला याच उंचीची इमारत दिसली. हे जवान तिकडे धावले. त्या बाजूच्या इमारतीच्या काचा फोडून मदत मागू लागले. मात्र, त्यांचा आवाज कुणाच्याही कानापर्यंत पोहचला नाही. अखेर अग्निशमन दलाच्या दुसऱ्या तुकडीने खालच्या मजल्यावरील आग नियंत्रणात आणली. तरीही आगीच्या ज्वाळा अधूनमधून उठतच होत्या. त्यातून वाट काढणे अवघड होते. इथे राहिल्यास मृत्यू गाठण्याची भीती होती. हिंमत करून एकमेकांना सांभाळत जवान एकेक पायरी उतरू लागले. त्यात सहा जवान गंभीर जखमी झाले. त्यांना आधार देतानाच मृतावस्थेतील सहकाऱ्याला पाहून पाय गळाठून जात होते. मात्र, मोठ्या धैर्याने हे जवान खाली आले.
मृत्यूच्या मगरमिठीतून सुटलेले हे जवान भोंगळ प्रशासकीय कारभाराचे चटके दररोज सहन करीत असतात. नोकरी जाईल या भीतीने कोणीही बोलण्यास तयार होत नाहीत. आजच्या या आगीतून वाचलेल्या जवानांच्या फाटलेल्या गणवेशावरून ते कोणत्या परिस्थितीत काम करतात, हे दिसून आले.
"आगीचे लोळ उसळत होते. एका क्षणाला समोर काय घडतेय तेही कळत नव्हते. सर्वच सुन्न झाले होते. मात्र, एकमेकांना सांभाळत या मृत्यूच्या दाढेतून आम्ही बाहेर आलो.‘
- जितेंद्र वाझरे, विक्रोळी अग्निशमन केंद्र