मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात १० दिवसात २ महिन्यांचा पाणीसाठा जमा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात १० दिवसात २ महिन्यांचा पाणीसाठा जमा

Share This
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणामध्ये गेल्या १० दिवसांन पासून समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे गेल्या १० दिवसात दोन महिन्यांचा पाणीसाठा जमा झाल्याने मुंबई करांना थोडा दिलासा मिळालेला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावामध्ये १४ जुलैला ९६९९२ दशलक्ष लिटर्स एवढा पाणीसाठा जमा होता. हा पाणी साठ मुंबईला २६ दिवस पुरेल इतकाच होता परंतु यानंतर गेले १० दिवस तलाव क्षेत्रात समाधान कारक पाऊस पडत असल्याने २४ जुलैला सकाळी ६ वाजेपर्यंत ३ लाख १४ हजार ९७८ दशलक्ष लिटर्स पाण्याची नोंद झाली आहे . २४ तारखेपर्यंत ८५ दिवसांचा पाणीसाठा जमा झाला असून गेल्या १० दिवसात तलावान मध्ये ५९ दिवसांचा पाणीसाठा जमा झाला आहे. मोडक सागर ८२१४२, तानसा ३३९२५, विहार ८५६१, तुलसी ६६३२, अप्पर वैतरणा २४९२६, भातसा १२७४८१, आणि मध्य वैतरणा ३१३१० अशा एकूण ३१४९७८ दशलक्ष लिटर पाणी साठा जमा झाला आहे . 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages