दक्षिण मुंबई मध्ये उंदराचा सुळसुळाट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 July 2014

दक्षिण मुंबई मध्ये उंदराचा सुळसुळाट

१८ महिन्यात ४ लाख ७९ हजार उंदीर पकडले 
मुंबई / अजेयकुमार जाधव  http://jpnnews.webs.com
मुंबईमधील उच्चभ्रू वस्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या दक्षिण मुंबई मध्ये सध्या उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. मुंबईची लोकसंख्या वाढत असताना उंदरांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. दक्षिण मुंबईमधून पालिकेने गेल्या १८ महिन्यात ४ लाख ७९ हजार उंदीर पकडले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दक्षिण मुंबई मध्ये असलेल्या अस्वच्छतेमुळे इतके उंदरांचे प्रमाण वाढले असल्याचे समजते. 
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मधील उच्चभ्रू वस्ती म्हणून दक्षिण मुंबई प्रसिध्द आहे. उंच गगनचुंबी इमारती, इमारतींमध्ये योग्य जागा ठेवली नसल्याने दोन इमारतींमध्ये जागा नसल्याने टाकलेला कचरा वेळीच उचलला जात नाही. दक्षिण विभागात स्वच्छता ठेवली जात नसल्याने सर्वत्र कचरा तसाच पडून राहत आहे यामुळे उंदरांचे प्रमाण वाढले असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अभ्यासानुसार स्पष्ट झाले आहे. 

सन २०१३ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्याच्या कालावधीत ३ लाख ३१ हजार ३७२, सन २०१४ मध्ये जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात १ लाख ३० हजार १५ तर मे आणि जून या दोन महिन्यात १८ हजार असे एकूण ४ लाख ७९ हजार ३८७ उंदीर पालिकेच्या १३० कार्माच्र्यानी रात्र दिवस करून पकडले आहेत. उंदरांमुळे प्लेग सारखे रोग होण्याची शक्यता असल्याने दक्षिण मुंबई मधील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS