सात एसीपी झाडाखाली बसून दिवस घालवताहेत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सात एसीपी झाडाखाली बसून दिवस घालवताहेत

Share This
फोर्ट : एकीकडे शहरात घरफोडी व महिलांच्या सोनसाखळी चोरण्याच्या घटनांत वाढ झालेली असताना दुसरीकडे काम नसल्याने एकूण सात सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे व काही निरीक्षक कामाशिवाय आयुक्तालयातील झाडाखाली बसून आपले सेवेचे दिवस भरत आहेत. विशेष शाखा, हत्यारी विभाग व काही परिमंडळातील विभागांना अधिकारी नसतानाही या अधिकार्‍यांना नियुक्ती दिली नसल्यामुळे ते झाडाखाली बसून आपला दिवस भरत आहेत. आयुक्तालयातील मुख्य नियंत्रण कक्षात हे अधिकारी आपली हजेरी लावण्यासाठी येतात व हजेरी लावून झाल्यानंतर आयुक्तालयात असलेल्या भल्या मोठय़ा वडाच्या झाडाखाली दिवसभर बसतात. या अधिकार्‍यांतील काही अधिकारी हे अलीकडेच मुंबई शहरात बदलून आले आहेत. शहर पोलीस दलातील अनेक विभागांना अधिकारी नसतानाही ही अवस्था या अधिकार्‍यांवर का आली, याबाबत विचारणा केली असता आमच्यावर कोणी गॉडफादर नसल्याने तसेच आमची ओळख वरपर्यंत नसल्याने ही नामुष्की आमच्या नशिबी आल्याचे या अधिकार्‍यांनी सांगितले वशिलेबाज अधिकार्‍यांना चांगली पोस्टिंग दिली जाते; पण ज्यांचे कोणीच वाली नाही, त्यांच्या पदरी झाडाखाली बसण्याची वेळ येते. पोषाखात असलेल्या या अधिकार्‍यांना झाडाखाली बसलेले पाहून आयुक्तालयात कामासाठी येणार्‍या अनेक लोकांना आश्‍चर्य वाटते. पोलीस दलात बिनकामाचेही अधिकारी असतात, याची जाणीव होते. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages