भाजप नगरसेविका ढसा ढसा रडल्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजप नगरसेविका ढसा ढसा रडल्या

Share This
मुंबई , दि. २५ (प्रतिनिधी ) : भाजपच्या नगरसेविका मनीषा चौधरी यांनी  आमदार विनोद घोसाळकर यांच्या विरोधात तक्रार कारणार आहेत. बोरिवलीच्या एक्सर परिसरातील चौकाला मनीषा चौधरी यांच्या पुढाकाराने दिवंगत नेते प्रमोद महाजन याचं नाव देण्यात आले. मात्र या चौकाचे नाव बदलून "एक्सर गावदेवी  चौक" असे नाव त्या चौकाला देण्याचे पत्र घोसाळकर यांनी आयुक्तांना दिले आहे. या विषयी पत्रकारांशी बोलताना मनीषा चौधरी यांना अश्रू आवरले नाहीत आणि त्या ढसा ढसा रडल्या. 
बोरीवली येथील एकसर चौकाला दिवंगत प्रमोद महाजन यांचे नाव देण्यात आले होते, परंतु आमदार विनोद घोसाळकरांनी हे नाव बदलण्याचा जाणून बुजून प्रयत्न  आरोप चौधरी यांनी केला आहे . त्यामुळे त्यांची तक्रार पक्षश्रेष्टीकडे करनार असल्याचे त्या म्हणाल्या. हा सगळा प्रकार  असह्य झाल्याने गुरुवारी पालिकेच्या आर मध्य प्रभाग समितीचा बैठकीत चौधरी यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान,घोसाळकर यांनी हे आरोप फेटाळून लावले असून चौकाचे नामकरण आधीच झाल्याचे मला माहित नसल्याने मी तसा प्रस्ताव दिल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले . 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages