मुंबई पोलिसांना धमकीचं पत्र - हाय अलर्ट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई पोलिसांना धमकीचं पत्र - हाय अलर्ट

Share This
मुंबई पोलिसांना एक धमकीचं पत्र मिळालंय. हे धमकीचं पत्र इंडियन मुजाहिद्दीनच्या नावानं आलंय. आलेल्या धमकीच्या पत्रामुळं मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आलंय. गाझामध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा बदला मुंबईत घेण्याची धमकी या पत्रात दिली आहे. 

मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारियांना हे पत्र पाठवण्यात आलंय. १९९३ ला तुम्ही मुंबईला वाचवलं, आता वाचवू शकाल तर वाचवा तुमच्या मुंबईला" असं एक धमकीचं पत्र मुंबई ते पोलीस आयुक्त राकेश मारीया यांना मिळालाय. २५ जुलैला हे पत्र राकेश मारियांना मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.
पत्र मिळताच मुंबई हाय अलर्ट घोषित करण्यात आलं असून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. दरम्यान, मुंबई पोलिसांनी या पत्राबाबत दिल्ली पोलिसांनाही माहिती दिलीय.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages