मुंबई - एमआयएम (मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी नुकतीच यूथ रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि नगरसेवक मनोज संसारे यांची भेट घेतली. ओवेसी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दलित पक्षांसोबत आघाडी करण्याची शक्यता वर्तवल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. दलित आणि मुस्लिम समाजांना एकत्र आणल्यास मोठी राजकीय शक्ती निर्माण होऊ शकते, असा विश्वास ओवेसी यांनी "सकाळ‘शी बोलताना व्यक्त केला. रमजान ईदनंतर राज्यातील दलित नेत्यांसोबत राजकीय चर्चेबाबत पुढील हालचाली होतील, अशी माहिती त्यांनी दिली. एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांसोबत आपले वैयक्तिक संबंध आहेत, त्यामुळे ओवेसींची सदिच्छा भेट घेतल्याचे संसारे म्हणाले. दलित आणि मुस्लिमांना एकत्र आणण्याचा राज्यात सर्वप्रथम प्रयोग प्रा. जोगेंद्र कवाडे आणि हाजी मस्तान यांनी केला होता.
Post Top Ad
28 July 2014
Home
Unlabelled
एमआयएम-दलित पक्षांच्या आघाडीची शक्यता?
एमआयएम-दलित पक्षांच्या आघाडीची शक्यता?
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

