सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Share This
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभर शेकडो समाजोपयोगी कामाबरोबरच धार्मिक कामे केली आहेत. त्यात महादेवांची मंदिरे, मशिदी आणि बुद्धविहारे बांधली. त्यांच्या धर्मनिरपेक्ष राज्यकारभाराची जगभर दखल घेतली आहे. 
अहिल्यादेवी या महाराष्ट्र कन्या असल्यामुळे सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर असे नाव द्यावे, अशी मागणी कॉँग्रेसचे आमदार अँड़ रामहरी रूपनवर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. न्यायदान पद्धती, कडक शिस्त आणि प्रजेला मुलांप्रमाणे सांभाळणे हे जगातील राज्यकर्त्यांमध्ये असलेले गुण अहिल्यादेवींमध्ये होते. अशा पुण्यश्लोक मातोश्रींचे स्मारक करण्यासाठी जगातील तत्ववेत्ते व विद्यापीठे पुढे येत आहेत. त्यामुळे राज्यामध्ये त्यांचा आणि त्यांच्या विचारांचा सन्मान होण्यासाठी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी आमदार रूपनवर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages