एम-इंडिकेटर'चे नवे संस्करण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एम-इंडिकेटर'चे नवे संस्करण

Share This


मोबाईलवर रेल्वे, बेस्ट, रिक्षा, टॅक्सीपासून रोजगार, नाट्य, सिनेमा आणि इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती देणारा मुंबई वाटाड्या अर्थात 'एम-इंडिकेटर'चे नवे संस्करण शुक्रवारपासून उपलब्ध झाले आहे. एम-इंडिकेटरचा संस्थापक सचिन टेके या तरुणाने मुंबई प्रेस क्लबमध्ये झालेल्या कार्यक्रमात याबाबतची घोषणा केली.नव्या एम-इंडिकेटरवर पुढील सुविधा उपलब्ध आहेत.लोकलचे वेळापत्रक आणि सुधारित भाडे ऑफलाइन पाहणे, रेल्वेच्या बहुआयामी नकाशाचा समावेश, मेट्रो, मोनोचे वेळापत्रक आणि तिकीट दर, मेट्रोबद्दल एम-इंडिकेटरच्या माध्यमातून तक्रार करणे, गोराई जेट्टी ते गोराई खाडी व एस्सेल वर्ल्ड, मार्वे ते मनोरी व एस्सेल वर्ल्ड, गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा, अलिबाग, भाऊचा धक्का ते रेवस, मोरा ते मांडवा जेट्टी या मुंबई परिसरातील फेरी बोटींची माहिती, याशिवाय आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडून पाऊस व अन्य नैसर्गिक आपत्तीविषयी संदेश, मुंबई महानगरपालिकडून भरती-ओहोटीचा इशारा, हवामानाचा अंदाज आणि तापमानाची माहिती आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages