प्रमुख अग्निशमन अधिकारी ए. एन. वर्मा यांची उचलबांगडी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रमुख अग्निशमन अधिकारी ए. एन. वर्मा यांची उचलबांगडी

Share This
मुंबई - अंधेरी येथील लोटस पार्क इमारतीला लागलेली भीषण आग व बचाव कार्य करताना एका जवानाचा मृत्यू आणि २१ जवान जखमी झाले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी ए एन वर्मा यांची पदावरून उचलबांगडी केली आहे. एस. एच. नेसरीकर यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आल आहे. 
लोटस पार्क इमारतीला लागलेल्या आगीवेळी अग्निशमन दलाचे जवान सकाळी १० वाजल्यापासून आग विझवण्यासाठी श्रार्ठीचे प्रयत्न करत असताना या घटनास्थळी वर्मा संध्याकाळी ४ वाजता पोहचले होते. मोठी आगीची घटना घडली असतानाही वर्माना त्या घटनेचे गांभीर्य ओळखता आले नाही. पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी अंधेरीच्या आगी प्रकरणी चार दिवसापूर्वी अग्निशमन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली होती, त्या नंतर सोमवारी दुपारी वर्मा यांचा प्रमुख अग्निशमन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार मुदत संपुष्टात आल्याचे कारण देत त्यांच्याकडून हे पद काडून घेण्यात आले आहे. त्यामुळे वर्मा आता यापुढे उप प्रमुख अग्निशमन अधिकारी म्हणूनच कार्यरत राहणार आहेत.   

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages