18 वर्षाखालील गोविंदांवर बंदी : उच्च न्यायालयाचा निर्णय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

18 वर्षाखालील गोविंदांवर बंदी : उच्च न्यायालयाचा निर्णय

Share This
दहीहंडीत 18 वर्षाखालील मुलांचा समावेश नसावा, असा आदेश बाल गोविंद पथकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या संबधी सादर करण्यात आलेल्या याचिकेवर राज्य सरकारने निवेदन सादर केले. यावर निर्णय देत न्यायालयाने राज्य सरकारच्या बाजूने निर्णय दिला आहे. राज्य सरकार कोणत्या कायद्यानुसार कारवाई करणार हे या परिपत्रक नमूद करण्यात येणार आहे. जमिनीवर गादी टाकून त्यावर थर लावण्याचा सल्ला देत काँक्रिटच्या रस्त्यांवर दहिहंडी उभारण्यास परवानगी न देण्याची सूचना ही न्यायालयाने राज्य सरकारला दिली आहे. पथकांमधील बाल गोविंदांवर पोलीस कडक नजर ठेवणार आहेत. दरम्यान, 20 फुटांपर्यंत दहीहंडीचे थर लावण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी राज्य सरकारने उच्च न्यायालयात केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages