‘राइट टू पी’ साठी संघटनांचा पालिका आयुक्तांना इशारा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘राइट टू पी’ साठी संघटनांचा पालिका आयुक्तांना इशारा

Share This
मुंबई - शिक्षण आणि नोकरीनिमित्त घराबाहेर पडणार्‍या महिलांच्या सोयीसाठी मुंबईत जागोजागी स्वच्छ, मोफत, सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहे असावी, अशी मागणी घेऊन पुढे आलेली ‘राइट टू पी’ ही चळवळ आता आक्रमक होऊ लागली आहे. ‘‘संघटनेला दिलेली आश्‍वासने पूर्ण झाली नाहीत तर काय करायचं ते आमचं ठरलंय... आणि ते आम्ही नक्की करणार, मग तुम्हाला लाज वाटेल.’’ अशा शब्दांत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्तांना गर्भित इशारा दिला आहे. 


शहरात पुरुषांसाठी जशी सार्वजनिक स्वच्छतागृहे असतात तशाच त्या स्त्रियांसाठीही असाव्यात अशा मागणीसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून विविध संघटना ‘राइट टू पी’ ही चळवळ राबवत आहेत. या चळवळीतील ३० संघटनांनी एकत्र येऊन आज पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेतली. तीन वर्षांत प्रथमच संघटनेच्या शिष्टमंडळाला आयुक्तांनी भेट दिली. यावेळी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आयुक्तांना व पालिका अधिकार्‍यांना निषेधाची राखी बांधून मुंबईकर महिलांच्या सुरक्षिततेची जाणीव करून दिली.

संघटनेच्या मागण्या
-महिला, मुली, गर्भवती स्त्रिया, मधुमेही स्त्रिया, महिला पोलीस, रस्त्यावर राहणार्‍या महिला यांच्याकरिता या   स्वच्छतागृहांमुळे खूप मोठी सोय होणार आहे. 
- स्वतंत्र मोफत, स्वच्छ, सुरक्षित स्वच्छतागृह. 
- स्वच्छतागृहांचे व्यवस्थापन महिलांनीच करावे. 
- प्रत्येक दोन किमी अंतरावर स्वच्छतागृह असावे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages