महागाईच्या खाईत होरपळणार्या मुंबईकरांच्या खिशाला आता आणखी कात्री बसणार आहे. मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आली. तब्बल 2 रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे. ाता रिक्षाचे किमान भाडे हे 15 रुपयावरुन 17 रुपये होणार आहे तर टॅक्सीचे भाडे 19 वरुन 21 रुपये इतके होणार आहे.
तसंच मध्यरात्री बाराच्या नंतरची भाडेवाढही याच प्रमाणे असणार आहे.भाडेवाढीबाबत रिक्षा-टॅक्सी युनियनने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर कोर्टाने आपला निर्णय देत भाडेवाढीला हिरवा कंदील दिला आहे. ही भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार नाही. सुधारित इलेक्ट्रॉनिक मीटर्स बसवल्यानंतरच दरवाढ लागू होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सींना सुधारित मीटर्स बसवण्यासाठी 45 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच प्रत्यक्ष मीटरवर जोवर दरवाढ दिसत नाही तोवर वाढीव दर देण्याची गरज नाही. अगोदरच टॅरिफ कार्डची संकल्पना मोडीत काढली गेली आहे अशी माहिती मुंबई ग्राहक पंचायतचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी दिली.