गडचिरोलीमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न झाला. गडचिरोलीच्या चामुरशीमध्ये राष्ट्रवादीच्या निर्धार मेळावा होता. या मेळाव्यासाठी अजित पवार हजर होते.
मेळावा संपल्यानंतर अजित पवार स्टेजच्याखाली उतरत असताना वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी एका महिलेनं अजित पवारांवर चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न केला. पण तीचा प्रयत्न फसला. पोलिसांनी त्या महिलेला लगेच ताब्यात घेतलं.
पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर अजित पवार आणि राष्ट्रवादीचे इतर नेते कार्यक्रमस्थाळाहून बाहेर पडले. वेगळ्या विदर्भाच्या मागणी दिवसेंदिवस जोर चढत आहे. मागील आठवड्यात विदर्भवाद्यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला होता.
