"जीएसबी'ची सुरक्षा चोख - सीसीटीव्हीची नजर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

"जीएसबी'ची सुरक्षा चोख - सीसीटीव्हीची नजर

Share This
मुंबई - वडाळा येथील जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समिती यंदा सुरक्षेत वाढ करणार असून 36 सीसीटीव्हींची करडी नजर राहणार आहे; तसेच मंडप परिसरात सुरू असलेल्या धार्मिक विधींमध्ये अडथळा येऊ नये म्हणून गणेशमूर्तीपर्यंत जाण्यासाठी स्काय वॉक बनविण्यात येईल. 

या गणेशोत्सव मंडळाचे यंदा 60 वे वर्ष आहे. त्यानिमित्त केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी (ता.22) पत्रकार परिषद घेण्यात आली. उत्सव समितीचे अध्यक्ष राजन भट यांनी यंदा सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दर वर्षी खासगी रक्षक आणि पोलिसांच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था चोख असतेच त्यात यंदा वाढ करण्यात येणार आहे. यासाठी सीसीटीव्ही या परिसरात लावण्यात येतील. साध्या वेशातील सुरक्षा व्यवस्थाही तैनात ठेवण्यात येणार असून बरोबर मेटल डिटेक्‍टरसारखी व्यवस्था असेल.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती 
यंदा गणेशोत्सवाला 60 वे वर्षे असल्याने नामांकित व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील श्री क्षेत्र धर्मस्थळाचे प्रमुख पद्मभूषण डॉ. विरेंद्र हेगडे 6 सष्टेंबरला; तर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 7 सप्टेंबरला संध्याकाळी 6.30 वाजता या सोहळ्याला उपस्थित राहतील.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages