पुढील वर्षी प्लॅस्टिकच्या नोटा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 August 2014

पुढील वर्षी प्लॅस्टिकच्या नोटा

मुंबई - चलनामध्ये कागदी नोटांचे प्राबल्य कमी करून त्याऐवजी प्लॅस्टिक नोटा चलनात आणण्याचे रिझर्व्ह बॅंकेने ठरवले आहे. पुढील आर्थिक वर्षापासून या नोटा चलनात आणण्याचा रिझर्व्ह बॅंकेचा विचार आहे. अर्थात या नोटा पहिल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर चलनात आणल्या जातील. बनावट चलनी नोटा तयार करता येऊ नयेत यासाठी या प्लॅस्टिक चलनी नोटांमध्ये रचना करण्यात येणार आहे. याशिवाय राष्ट्रीय पातळीवर बिल पेमेंट सिस्टिम तयार करून त्याद्वारे दलाल ही संकल्पना मोडीत काढून कार्यक्षमता वाढवण्याचा विचारही रिझर्व्ह बॅंकेने केला आहे. 

2013-14 च्या वार्षिक अहवालात रिझर्व्ह बॅंकेने प्लॅस्टिक किंवा कागदी नोटांना पर्यायी नोटा चलनात आणण्याचे सूतोवाच केले होते. या वर्षी जानेवारीत प्लॅस्टिक नोटांसाठी रिझर्व्ह बॅंकेने निविदा काढल्या. या निविदांना चांगला प्रतिसाद मिळाला असून 1 अब्ज नोटांसाठी निविदा भरल्या गेल्या आहेत. या नोटांची चाचणी सिमल्यासह पाच शहरांतून केली जाणार असल्याचे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सिमल्यामध्ये संचालक मंडळाच्या बैठकीनंतर सांगितले. प्रायोगिक तत्त्वावरील या नोटांचे बाजारातील चलन व्यवस्थित झाल्यास मगच या नोटा देशात सर्वत्र चलनात आणल्या जातील, असेही राजन म्हणाले. या प्लॅस्टिक नोटा प्रायोगिक तत्त्वावर सिमला, कोची, म्हैसूर, जयपूर व भुवनेश्‍वर या शहरांतून चलनात आणल्या जाण्याची शक्‍यता आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS