राज्यात अपघातांचे वाढते प्रमाण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यात अपघातांचे वाढते प्रमाण

Share This
रफ ड्रायव्हिंगमुळे खेडोपाड्यातील रस्त्यावर आणि महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रोज किमान ४ ते ५ अपघात हे राज्यातील विविध भागात होतातच. त्यात प्रवाशांचा मृत्यू देखील होतो. २0१३ मध्ये ११ हजार ७ मोठे अपघात झाले असून त्यामध्ये १२ हजार १९४ जणांना रस्ते अपघातांत आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रस्ते अपघातांची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करू लागली आहे. 


गेल्या काही दिवसांमध्ये ड्रायव्हरला लागलेल्या डुलकीमुळे अपघातांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महामार्ग असो वा छोटे रस्ते, गाड्या चालवताना त्यांचा वेग नियंत्रित असावा, लेन क्रॉस करू नका, ओव्हरटेकिंग, मद्यपान करून वाहन चालवणे, लेन कटिंग करणार्‍यांवर महामार्ग पोलीस कारवाई करतच असतात. तरीसुद्धा अपघातांचे प्रमाण हे वाढतच आहे. मानवी चुकांमुळे सुमारे ८0 टक्के अपघात होतात. सुट्टीचा हंगाम असला की ड्रायव्हर्स अधिक वेळ ड्रायव्हिंग करतात. त्यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राज्यात अपघातांची संख्या वाढते आहे आणि त्यात मृत्युमुखी पडणार्‍या आणि जखमी होणार्‍या प्रवाशांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढते आहे. परिणामी, रस्ते सुरक्षिततेविषयी चालक आणि सामान्य प्रवासी दोघांमध्येही जागरुकता आणणे आवश्यक आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages