मुंबई : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी मुंबईत येणार आहेत. या वेळी सायन कोळीवाडा येथील नवीन जीटीबी नगरमधील गुरुनानक कॉलेज ऑफ आर्ट्स अँण्ड कॉर्मसच्या रौप्य महोत्सवाचे उद््घाटन कलाम यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी गुरुनानक कॉलेज ऑफ आर्ट्स अँण्ड कॉर्मस महाविद्यालयाच्या ऑडिटोरियममध्ये सकाळी ११.३0 वाजता हा शुभारंभ सोहळा पार पडणार आहे. या वेळी महनीय पाहुणे म्हणून 'इन्स्टिट्यूट ऑफ केमिल टेक्नॉलॉजी'चे संचालक पद्मभूषण प्रा. एम. एम. शर्मा आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकरदेखील उपस्थित राहणार आहेत.
Post Top Ad
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

