सिद्धार्थ वसतिगृहाचे वीज पाणी कापले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सिद्धार्थ वसतिगृहाचे वीज पाणी कापले

Share This
वसतिगृह लवकरच पडले जाणार 
मुंबई / अजेयकुमार जाधव 
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वडाळा येथील सिद्धार्थ वसतिगृहाची वीज आणि पाणी मंगळवारी कापण्यात आले आहे. या वसतिगृहाला नुकतेच मुंबई महानगर पालिकेने धोकादायक ठरवून हि इमारत खाली करण्याची नोटीस बजावली होती. 

सिद्धार्थ वसतिगृहाला नुकतीच ५० वर्षे झाली आहेत. या इमारतीची डागडुजी केली नसल्याने बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या वसतिगृहाची अवस्था बिकट झाली आहे. पालिकेने या इमारतीला ३५४ कलमा नुसार धोकादायक इमारत जाहीर करून इमारत खाली करावी असे सांगितले आहे. परंतू या इमारतीमध्ये विद्यार्थी राहत असून त्यांच्या शैक्षणिक आयुष्याचे नुकसान होणार असल्याने पालिकेने सहानभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी केली जात आहे. 

पालिकेला फक्त ३५४ ची नोटीस देण्याचा अधिकार आहे,  इमारत तोडण्याचे अधिकार पालिकेला नाहीत. धोकादायक इमारत तोडण्याचे अधिकार पालिकेला मिळावेत म्हणून पालिकेने राज्य सरकारला अधिकार देण्याची मागणी केली आहे. तसेच पालिकेने धोकादायक इमारतींचे केलेलं ऑडीट चुकीचे असल्याने फेर ऑडीट करण्याची घोषणा पालिकेने केली आहे. असे असताना वसतिगृह पडण्याची घाई केली जात आहे. 

वसतिगृह खाली करण्यासंधर्भात दिलेल्या नोटीसीबाबत दादरच्या शिंदेवाडी कोर्टात केस सुरु आहे अशी माहिती पालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या इमारत व कारखाने विभागाचे सहाय्यक अभियंता एस. जी. मालेकर यांनी राज्य माहिती आयोगाच्या आणि पालिका आयुक्त यांच्या आदेशा नंतर जुलै २०१४ मध्ये दिली आहे. यामुळे या बाबत प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना ईमारत पाडण्याची घाई का केली जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages