मुंबई : मुंबईकरांसाठी खूशखबर आहे.. सध्या सुरू असलेली १0 टक्के पाणीकपात महापालिकेने मागे घेतली असून व्यावसायिक आस्थापनांसाठीही असलेले ५0 टक्के निर्बंधही पालिकेने उठवले. बुधवारपासून मुंबईकरांना नेहमीप्रमाणे पाणी मिळणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्या जलाशयांमध्ये सध्या चांगला पाऊस पडत असल्याने हा निर्णय मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी जाहीर केला.
३१ जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ३३ हजार दशलक्ष लिटर इतक्या उपयुक्त पाणीसाठय़ाची आवश्यकता आहे. मंगळवारपासून ३0 सप्टेंबर २0१४ पर्यंत ४९ दिवस आणि १ ऑक्टोबर २0१४ ते ३१ जुलै २0१५ पर्यंत ३0४ असे एकंदर ३५३ दिवस आणि वैतरणामध्ये २८८ दिवसांचा व भातसामध्ये २२७ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे. ऑगस्टचे शिल्लक दिवस आणि पूर्ण सप्टेंबर लक्षात घेता पावसाचे एकूण ४९ दिवस बाकी आहेत. या दिवसांतही काही प्रमाणात पाऊस होणार असल्याने पाणीसाठा आणखी वाढेल, अशी माहिती पालिकेच्या जल पुरवठा विभागातील एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. १२ ऑगस्ट रोजी १२ लाख ४१ हजार ८२७ दशलक्ष लिटर्स पाणीसाठा सर्व जलाशयांत उपलब्ध असून गेल्या वर्षी याच दिवशी १२ लाख ४0 हजार 0५४ दशलक्ष लिटर्स पाणीसाठा शिल्लक होता. यंदा हा साठा समाधानकारक असल्यानेच ही कपात मागे घेतल्याचे या अधिकार्याने सांगितले.
जून आणि जुलै महिन्यांतील काही दिवस पावसाने दडी मारल्याने पाणीकपातीला सुरुवात झाली; पण २७ जुलैपासून जलाशयातील पाणीसाठा वाढू लागल्यामुळे कपात मागे घेता येऊ शकते, अशी शक्यता होती; पण सर्वच जलाशयांतील पाणीसाठा पूर्णपणे समाधानकारक झाल्यानंतरच पाणीकपात पूर्णत: मागे घेण्याचा निर्णय झाला आहे, असे हा अधिकारी म्हणाला.