दक्षिण मध्य मुंबईतील मानखूर्द परिसरातील विकासाला नेव्हीकडून परवानगी न मिळाल्यामुळे येथील विकास रखडला आहे त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने यासाठी परवानगी देवून विकासाचे मार्ग खूले करावेत अशी मागणी दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनी आज संसदेत केली.
खासदार राहूल शेवाळे यांनी ही बाब संसदेत सरकारच्या निदर्शनास आणून देताना सागितले की, मानखूर्द येथे नेव्हीचा नेव्हल आर्म डेपो आहे त्यामध्ये ज्वलंतशिल पदार्थाचा साठा केला जातो. त्त्याच डेपोपासून काही अंतरावर लोकवस्ती असून त्या परिसरचा विकास करण्याची परवानगी मुंबई महापलिकेला नेव्ही कडून देण्यात न आल्यामुळे या परिसराचा विकास रखडला आहे.
अर्बन डेव्हलपमेंट कडून दहा वर्षापुर्वी या परिसरासाठी 0.5 एफएसआय देण्यात येत होता आता हा एफएसआय 1.33 पर्यंत देण्यात येतो मात्र या परिसराचा विकास करण्यासाठी मुंबई महापलिकेला नेव्हीकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असते गेल्या काही वर्षात परवानगी न मिळाल्यामुळे हा विकास रखडला आहे त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी खासदार शेवाळे यानी केली आहे.
