'विद्यार्थी भारती' सोमवारी 'काळा दिवस' पाळणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'विद्यार्थी भारती' सोमवारी 'काळा दिवस' पाळणार

Share This
मुंबई : शिक्षणाचे खाजगीकरण आणि गाझामध्ये होणार्‍या हल्ल्यांविरोधात 'विद्यार्थी भारती' ही संघटना येत्या सोमवारी राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये 'काळा दिवस' पाळणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी काळे कपडे घालून व काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करतील, अशी माहिती संघटनेच्या स्मिता साळुंखे यांनी दिली. शिक्षणाच्या वाढत्या खाजगीकरणाबरोबरच परदेशी विद्यापीठांची सुरुवात होत असल्याने बहुजन विद्यार्थ्यांपुढे शैक्षणिक आव्हान उभे केले जात आहे. खाजगी विद्यापीठांमध्ये जागेचे आरक्षण असले तरी फीमध्ये कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात आलेली नाही. अशा खाजगी विद्यापीठांना मान्यता देऊन सरकार बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा नवा डाव रचत आहे, असा आरोप 'विद्यार्थी भारती'ने केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages