मॅरेथॉन मधून वैश्विक तापमानवाढी विषयी जनजागृती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 August 2014

मॅरेथॉन मधून वैश्विक तापमानवाढी विषयी जनजागृती

भाईंदर (प्रतिनिधी)-दिवसेंदिवस  ग्लोबल वार्मिंग म्हणजेच वैश्विक तापमानवाढ यासमस्येकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी शंकर नारायण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाशाखेच्या वतीने पर्यावरण जनजागृतीच्या दृष्टीने रविवार२४ ऑगस्ट रोजी आंतर महाविद्यालयीन मेगा मान्सून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

ग्लोबल वार्मिंग ही सध्याची ज्वलंत समस्या आहे. यामुळे भविष्यात खूप मोठा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आज संपूर्ण जगासमोर भेडसावत असलेल्या  सगळ्या समस्यांपेक्षा  सर्वांत भयानक अशी ही समस्या आहे आणि हे संपूर्ण जगाने मान्य केले आहेकालानुरूप मानव प्रगती करत गेला, औद्योगिक क्रांती झाली मात्र हीच औद्योगिक क्रांती ‘ वैश्विकतापमानवाढी ’चे प्रमुख कारण होवून बसली आहे. हरीतवायूचे मोठया प्रमाणावरील उत्सर्जन वैश्विकतापमानवाढीला कारणीभूत ठरले आहे. सर्वच देशांनी औद्योगिक क्रांतीचा मार्ग अवलंबिला आहे,त्यामुळे सगळ्याच देशातून हरीतवायू उत्सर्जित केले जातात मात्र  हेच वैश्विक तापमानवाढीलाजबाबदार ठरले आहेत. वैश्विक तापमानवाढीमुळे अनेक हिमनद्या नामशेष होण्याच्या मार्गावरआहेत, बर्फाच्छादित पर्वत तसेच खंड वितळत चालले आहेत. यामुळे अनेक देशांच्या सरासरीतापमानात वाढ होत चालली आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चालली असून भविष्यातअनेक महत्वाच्या शहरांना धोका संभवत आहे . यावर एकमेव उपाय म्हणजे हरीतवायूचे उत्सर्जनआटोक्यात आणणे हाच  संदेश राष्ट्रीय सेवा योजना तर्फे ' मेगा मान्सून मॅरेथॉन ' मधून देण्यात येणार आहे. 

मुंबई विद्यापीठातील ५५६ महाविद्यालया पर्यंत हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाआहे. तसेच ग्रामीण भागातील महाविद्यालयातील युवा विद्यार्थी या मॅरेथॉन मध्ये पर्यावरण जनजागृतीचा संदेश घेऊन धावणार आहेत शंकर नारायण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शाखेच्या वतीने आयोजण्यात आलेल्या स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे. या मेगा मान्सून मॅरेथॉनच्या माध्यमातून वैश्विक तापमानवाढ  अर्थात ग्लोबल वार्मिंगच्या समस्येकडेलक्ष वेधले जाणार आहे. सामाजिक जनजागृतीच्या उद्देशाने होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेत प्रत्येक स्पर्धक वैश्विक तापमानवाढ विषयी  सामाजिक  संदेश लिहिलेले  टी  शर्ट परिधान करणार आहे.पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने होणाऱ्या या स्पर्धेत स्पर्धकांना प्रमाणपत्र प्लास्टिक पिशवीऐवजी कापडीपिशवीतून देण्यात येणार आहे. या सर्व प्रयत्नातून युवापिढी, जनतेला वैश्विक तापमानवाढरोखण्याच्या दृष्टीने अधिकाधिक जागरूक करण्यात येणार आहे.  मुंबई विद्यापीठातील ५५६महाविद्यालयातून तसेच ग्रामीण भागातून २० हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी रा.से. योजना  विद्यार्थी समन्वयक  शाहरुख मुलाणी ९८६७७३३७६६ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
Displaying nss 3.jpg


Post Bottom Ad

JPN NEWS