नगरसेव‌िका श्रध्दा पाटील आण‌ि त्यांच्या पतीला रंगेहाथ पकडले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नगरसेव‌िका श्रध्दा पाटील आण‌ि त्यांच्या पतीला रंगेहाथ पकडले

Share This

Shraddha

मुंबई महापालिकेचे 'मुंबई स्वच्छता प्रबोधन अभियान' राबव‌िणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकाला हप्ता देण्यासाठी धमकावणारी मनसे नगरसेव‌िका श्रध्दा पाटील आण‌ि त्यांच्या पतीला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) गुरुवारी रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. 

माहीमच्या १८१ वॉर्डातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नगरसेविका असलेल्या श्रध्दा पाटील यांचे पती त्याच वॉर्डात महापालिकेच्या स्वच्छता अभियान राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या संचालकाला अभियानातून बाहेर पडण्यासाठी धमकावत होते. तसेच महिन्याला १० हजार रुपये हप्ता देण्यासाठीही त्यांनी त्यांचा छळ सुरू केला होता. त्याचप्रमाणे श्रध्दा पाटील यांनी ही संस्था चांगले काम करत नसल्याची तक्रार महापालिकेत दाखल केली होती आणि त्या माध्यमातून त्या या संस्थेवर दबाव टाकत होत्या. बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम ही संस्था करत असताना, नगरसेव‌िका पाटील यांच्या जाचाला संचालक कंटाळले होते. अखेर संचालकाने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून एसीबीने रचलेल्या सापळ्यात पाटील यांचे पती राजेश यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांवरही गुन्हे दाखल झाले असून, त्यांना अटक करण्यात आली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages