'ISIS'मध्ये सामील झालेल्या चार युवकापैकी एकाचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'ISIS'मध्ये सामील झालेल्या चार युवकापैकी एकाचा मृत्यू

Share This

'ISIS'मध्ये सामील झालेल्या ठाण्यातील 'त्या' चार युवकापैकी एकाचा मृत्यू

इराकमध्ये आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या वंशवादी लढ्याला साथ देण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील एका मुस्लिम युवकाचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. दोन-अडीच महिन्यापूर्वी ठाण्यातील चार मुस्लिम युवक इराक व सिरीयातील लढ्यात सामील झाले होते. याबाबत सांगितले जात आहे की, ठाण्यातील कल्याणमध्ये राहणा-या आरिफ फय्याज माजिद याचा इराकमध्ये गोळीबारात मृत्यू झाला आहे. 

गेल्या 23 मेपासून आरिफ, फहद तनवीर शेख, अमन नईम तंदेल आणि शाहीन फारुकी टंकी अचानक बेपत्ता झाले होते. यानंतर काही दिवसानंतर आरिफ याच्या कुटुंबियांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

आरिफ इंजीनियरिंगचा विद्यार्थी होता. त्याच्या मृत्यूची माहिती त्याचे इतर तीन सहका-यांपैकी एक असलेल्या फहद तनवीर शेखने त्यांचे चुलते इफ्तिखार शेख यांना फोनवरून दिल्याचे समजते. शाहीनने मंगळवारी रात्री याबाबतची माहिती दिली.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, शाहीनच्या काकाने आरिफची ख्यालीखुशाली विचारली तेव्हा त्याने तो दहशतवादी कारवाई सुरु असताना मारला गेल्याचे सांगितले. यापेक्षा माझ्याकडे अधिक माहिती नसल्याचे शाहीनने सांगितले. इफ्तिखार यांनी सांगितले की, याबाबत अधिकृत कोणतेही माहिती मिळाली नाही.
ठाण्यातील कल्याणमधील जे चार मुस्लिम युवक आयएसआयएस दहशतवादी संघटनेत सामील झाले आहेत ते दुध नाका गोविंदवाडी या भागात राहत होते. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने 14 जुलै रोजी आरिफच्या घरातून लॅपटॉप आणि पेनड्राइव हस्तगत केला होता. त्यानंतर 18 जुलै रोजी आरिफच्या कुटुंबियांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages