मुंबई: महाराष्ट्राची जनता राजकारणाला कंटाळली असल्याने मतदारांना पर्याय मिळावा म्हणून संविधान मोर्चाचे गठन करण्यात आल्याचे हनुमंत उपरे, ब्रिगेडियर सुधीर सावंत, आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, लोकशासन पक्षाचे बी. जी. कोळसे पाटील, शिवराज्य पक्षाचे सुधीर सावंत, सत्य शोधक ओबीसी परिषदेचे हनुमंत उपरे, ओबीसी सेवा संघाचे प्रदीप ढोबळे, राष्ट्रीय गोर बंजारा परिवर्तन अभियानाचे दिगंबर राठोड, खोरीपचे सयाजी वाघमारे यांनी एकत्र येउन संविधान मोर्च्याची स्थापना केली आहे. या मोर्च्याच्या वतीने सीपीएम, सीपीआय, शेकाप, जनता दल सेक्युलर तसेच डाव्या आघाडीचे भारिप बहुजन महासंघा बरोबर चर्चा सुरु असल्याचे आनंद राज यांनी यावेळी सांगितले.