तांत्रिक बिघाडामुळे टाटा - बेस्टमध्ये वाद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तांत्रिक बिघाडामुळे टाटा - बेस्टमध्ये वाद

Share This

मुंबई : टाटा पॉवरच्या जनरेटर युनिट-५ मधील तांत्रिक बिघाडामुळे मंगळवारी संपूर्ण मुंबईला पहिल्यांदाच थोड्या अधिक फरकाने सहन कराव्या लागलेल्या भारनियमनामुळे बेस्ट आणि टाटा यांच्यातील वाद पुन्हा एकदा दिसून आला आहे. दक्षिण मुंबईत बेस्टच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येत असला तरी त्यासाठी वीज टाटा पॉवरकडून पुरविण्यात येते. त्यामुळे मंगळवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास टाटा पॅावरच्या ट्रॉम्बे येथील जनरेटर युनिट ५ मध्ये बिघाड झाल्याने संपूर्ण मुंबईत अंधार पसरला होता. मुंबईत पहिल्यांदाच अशा प्रकारच्या भारनियमनाला सामोरे जावे लागल्याने मुंबईकरांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. 
टाटा पॉवरकडून बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मात्र व्यवस्थापकीय संचालक अनिल सारदाना यांनी बेस्टची परवानगी आवश्यक असणारे आणि ऑईल व गॅसवर सुरू राहणारे युनिट ६ कार्यान्वित नसल्याने हा त्रास सहन करण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले आहे. युनिट ५ मध्ये बिघाड झाल्यास युनिट ६ कार्यान्वित करण्याचा पर्याय असला तरीही बेस्टकडून युनिट ६ कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असणारा ऑईल व गॅसचा पुरवठा करण्यात येत नाही त्यामुळे बेस्टच्या संमतीने युनिट ६ बंद ठेवण्यात आले आहे. युनिट ६ मधील वीजपुरवठा हा महाग असल्याचे कारण त्यामागे असून जर मंगळवारी युनिट ६ कार्यान्वित असते तर मुंबईकरांवर ही वेळ आली नसती, असे अनिल सारदाना यांनी स्पष्ट केले आहे.

युनिट ६ गॅस, ऑईलपेक्षा कोळशावर चालविण्यासाठी स्थानिकांकडून विरोध असून त्यासाठी पर्यावरण खात्याची मंजुरी आणि राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे. तर याबाबत बेस्टच्या महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी तांत्रिक बिघाड खरोखर झाला होता की करण्यात आला होता, असा प्रश्न उपस्थित करीत नुकतेच जेथे केवळ बेस्टला वीजपुरवठा करण्याची मुभा आहे तेथे म्हणजेच दक्षिण मुंबईत टाटा पॉवरला वीजपुरवठा करण्याची परवानगी देण्यात आल्याचे अधोरेखित केले. त्यामुळे वीजपुरवठा करण्याची जबाबदारी आमची असताना आणि आम्ही वीजनिर्मिती करत नसल्याने वीज खंडित करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या ग्राहकांना आपल्याकडे वळविण्यासाठी असे करण्यात आल्याचेही प्रसिद्धी पत्रकात बेस्टकडून सांगण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages