नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात असताना नगरसेवकांना हवा आरोग्य विमा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात असताना नगरसेवकांना हवा आरोग्य विमा

Share This
मुंबई - आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. पालिका कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा मिळणार असल्याची कुणकुण लागताच नगरसेवकांकडूनही आरोग्य विम्याची मागणी होऊ लागली आहे. तसा ठराव महासभेत मांडण्यात आला आहे. अपुरी स्वच्छता, दूषित पाणी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात असताना नगरसेवकांना स्वतःसाठी मात्र आरोग्य विम्याची गरज भासत आहे. 


महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे. यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. परदेश दौऱ्यावर असतानाही या विम्याचे संरक्षण मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना विम्याचे संरक्षण मिळणार असल्याची कुणकुण लागताच नगरसेवकांनाही आरोग्य विम्याची गरज भासू लागली आहे. तसा ठराव महासभेत कॉंग्रेसच्या नगरसेविका उषा कांबळे यांनी मांडला आहे. नगरसेवकांना अनेक वेळा साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची पाहणी, नालेसफाई अशा विविध कामांवर देखरेख ठेवावी लागते. त्यासाठी त्यांना कोठेही फिरावे लागते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने नगरसेवकांसाठी आरोग्य विमा आवश्‍यक असल्याचे कांबळे यांनी या ठरावात म्हटले आहे.

नगरसेवकांकडून आतापर्यंत अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. थंड हवेच्या ठिकाणी विश्रांती, माजी नगरसेवकांसाठी तरणतलावात मोफत सोय अशा अनेक अजब मागण्या यापूर्वीही नगरसेवकांकडून करण्यात आल्या आहेत. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages