मोदी यांचे भाषण ऐच्छिक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोदी यांचे भाषण ऐच्छिक

Share This
modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण आज, शुक्रवारच्या शिक्षक दिनी प्रसारित होणार आहे. पण हे भाषण ऐकवण्याची सक्ती मात्र केंद्र सरकार तसेच राज्य सरकारनेही मागे घेतल्याने शिक्षक-मुख्याध्यापक-विद्यार्थी आणि पालकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सूचनेनंतर गुरुवारी शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी भाषण विषय ऐच्छिक असल्याचे जाहीर केले.

आजच्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून देशभरातील शाळांतील विद्यार्थी-शिक्षकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. मोदींचे हे भाषण शाळांमध्ये दाखविण्याची सक्ती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली होती. त्यापाठोपाठ राज्य सरकारनेही हा निर्णय राबवला. पण या सक्तीविरोधात राज्यातील शिक्षक संघटनांनी आवाज उठवला. पश्चिम बंगाल, केरळ व तामिळनाडूतही अशाच प्रतिक्रिया उमटल्याने अखेर केंद्राने भाषण दाखवण्याची सक्ती नसल्याचा पवित्रा घेतला. पण तरीही राज्य सरकारने कोणतीच भूमिका जाहीर न केल्याने संभ्रम निर्माण झाला होता. गुरुवारी मात्र सरकार जागे झाले. मोदी यांचे भाषण दाखवण्याची अथवा ते पाहण्या-ऐकण्याची कुणाही शाळा अथवा विद्यार्थ्यावर सक्ती नसल्याचे राज्य शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages