राज्य निवडणूक आयुक्‍तपदाचा सहारियांनी कार्यभार स्वीकारला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 September 2014

राज्य निवडणूक आयुक्‍तपदाचा सहारियांनी कार्यभार स्वीकारला

मुंबई - राज्याचे माजी मुख्य सचिव आणि नवनियुक्त राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आपल्या पदाचा कार्यभार आज स्वीकारला. मुख्य सचिव म्हणून सहारिया जुलै 2014 अखेरीस सेवानिवृत्त झाले होते. 


राज्याच्या आधीच्या निवडणूक आयुक्‍त नीला सत्यनारायण यांची मुदत 5 जुलै रोजी संपली असताना या पदावर आपली नेमणूक व्हावी यासाठी सहारिया यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अर्ज केला होता. राज्य निवडणूक आयुक्‍त पदावर नेमणूक होण्यासाठी सहारिया यांच्यासोबतच परिवहन विभागाचे विद्यमान प्रधान सचिव डॉ. शैलेशकुमार शर्मा, सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव टी. सी. बेंजामिन, माजी प्रधान मुख्य वन संरक्षक ए. के. जोशी आणि सर्वेशकुमार यांनीही अर्ज केले होते. गेल्या बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहारिया यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले. नवीन प्रशासन भवनातील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आज सहारिया यांनी आयुक्‍तपदाचा कार्यभार स्वीकारला. या वेळी आयोगाचे सचिव मधुकर गायकवाड यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Post Bottom Ad