बस चालकाचा वरिष्ठांवर हल्ला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बस चालकाचा वरिष्ठांवर हल्ला

Share This

BEST

शिफ्टवरून झालेल्या वादामुळे एका बस चालकाने आपल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना मुंबई सेंट्रल बस डेपोमध्ये घडली. त्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचीही माहिती मिळते आहे. बस चालकाचे नाव शंकर माने असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मुंबई सेंट्रल बस डेपोमध्ये आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास शंकर माने या बस चालकाचा वरिष्ठ अधिकारी दिलीप डोंगरे, रतन शेडगे यांच्याशी प्रचंड वाद झाला. संतप्त चालकाने आपल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोयत्याने हल्ला केला. त्यानंतर तो घाबरला आणि त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार डेपोतील अन्य कर्मचाऱ्यांना कळल्यावर त्यांनी या तिघांनाही उपचारासाठी नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

दरम्यान, बस चालकाने केलेल्या हल्ल्याचे अधिकृत कारण पोलिसांकडून सांगण्यात आलेले नाही. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages