मोदींच्या "तासा'वर कॉंग्रेसची टीका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोदींच्या "तासा'वर कॉंग्रेसची टीका

Share This
नवी दिल्ली - शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादावर कॉंग्रेसने टीका केली आहे. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधणे गैर नसले, तरी आजचा दिवस शिक्षकांसाठी राखून ठेवणे गरजेचे होते, असे कॉंग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी म्हटले आहे. 


मुले शिक्षकांचे अनुकरण करतात, असे मोदींनी त्यांच्या भाषणात म्हटले होते. यावर, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एका साच्यात न तयार करता त्यांना त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी मदत करणे अपेक्षित आहे, असे खुर्शिद म्हणाले. 

तमिळनाडू, केरळसह दक्षिणेकडील राज्यांमधील काही शाळांनी मोदींच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण दाखविणे टाळले. केरळमध्ये अनेक शाळांनी भाषण दाखविण्याची तयारी केली असूनही राज्य नियंत्रित वाहिन्यांनी ते प्रक्षेपितच न केल्याने विद्यार्थ्यांना ते पाहता आले नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages