शिक्षिकेला मुंबईच्‍या उपमहापौरपदावर विराजमान होण्‍याचा बहुमान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिक्षिकेला मुंबईच्‍या उपमहापौरपदावर विराजमान होण्‍याचा बहुमान

Share This
देशभर शिक्षक दिन वेगवेगळया पध्‍दतीने साजरा होत असताना मुंबईत भारतीय जनता पार्टीने हाडाच्‍या शिक्षिका असलेल्‍या नगरसेविका अलका केरकर यांना उपमहापौर पदाची संधी देऊन समाज घडविण्‍याचे काम करणा-या शिक्षकांचा अत्‍यंत वेगळया पध्‍दतीने सन्‍मान केला आहे.महापालिका वॉर्ड क्रमांक 93 मधून भाजपातर्फे नगरसेवक निवडून आलेल्‍या अलका केरकर यांना मुंबईच्‍या उपमहापौरपदी विराजमान होण्‍याची संधी मिळणार आहे त्‍यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

अलका केरकर या गेली 18 वर्षे स्‍थानिक वॉर्ड पातळीवर स्‍थानिक प्रश्‍न्‍ सोडविणा-या सामान्‍य कार्यकर्त्‍या आहेत. कोणत्‍याही पदाची अपेक्षा न करता काम करणा-या अलका केरकर यांनी वॉर्ड क्रमांक 93 मध्‍ये तत्‍कालिन नगरसेविका क्रांती साठे यांच्‍यासमवेत आणि त्‍यानंतरच्‍या काळात अत्‍यंत चिकाटीने आणि मेहनतीने काम केले. साधी रहाणीमराठीइंग्रजीहिंदी या तिन्‍ही भाषांवर उत्‍तम प्रभुत्‍वस्‍थानिक प्रश्‍नांची जाण असलेल्‍या केरकर यांचा खारबांद्रा परिसरातील अॅडव्‍हान्‍स लोकल मॅनेजमेंट (एएलएम), एनजीओ व रहिवाशी संस्‍थांसोबत काम करण्‍याचाही अनुभव दांडगा आहे. तसेच खार जिमखानाबांद्रा परिसरातील चर्चअग्यारी यासारख्‍या धार्मिक संस्‍थांसोबतही त्‍यांनी गेली 20 वर्षे काम केले आहे. मुळच्‍या कोकणातील असणा-या अलका केरकर यांनी खार येथील बीपीएम हायस्‍कूल मध्‍ये शिक्षिका म्‍हणूनही काही वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्‍या तयारी पासूनच बूथ प्रमुखांच्‍या नियुक्‍तीवर विशेष भर दिला आहे. अशाच एका बुथ प्रमुख ते नगरसेवक पदापर्यंत काम करणा-या अलका केरकर यांना मुंबईच्‍या सन्‍मानाच्‍या उपमहापौर पदावर विराजमान होण्‍याची संधी भाजपाने देऊन सामान्‍य कार्यकर्त्‍याचा व बुथ पातळीवर काम करणा-या कार्यकर्त्‍यांचाही सन्‍मान केला आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages