मतदार नोंदणीचा फज्जा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मतदार नोंदणीचा फज्जा

Share This

निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयांकडून वगळण्यात आलेल्या अर्जदारांना पुन्हा नोंदणीसाठी पाठवण्यात आलेल्या अर्जांपैकी ९0 टक्के अर्ज परत निवडणूक कार्यालयात परत आल्याचे सांगण्यात आले आहे. 
जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांच्या कार्यालयाकडून निवडणुकीच्या कामाची सुरुवात करण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून वगळलेल्या मतदारांना तसेच ज्यांना विविध कारणास्तव मतदान करता आले नाही अशाचा अर्ज स्पीड पोस्टच्या माध्यमातून अर्ज पाठवण्यात येत आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपनगरातील ६ लाख अर्जदारांना असे अर्ज पाठवण्यात आले होते, मात्र त्यापैकी केवळ ९५ हजार अर्जदारांनीच अर्ज मिळाल्याची पोचपावती दिली आहे. उर्वरित ५ लाख ५ हजार अर्जदार त्या पत्त्यावर राहत नसल्याने अर्ज परत आल्याचे दिसून आले आहे. 

प्रत्येक विभागात मोबाईल व्हॅन फिरवण्यात येत असून ज्या अर्जदारांची नोंदणी झालेली नाही त्यासाठी ही घरपोच नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नव्या नोंदणीनुसार यंदा दीड लाखाच्या आसपास नवे नोंदणी झाल्याचे सांगण्यात आले असून मतदारांनी नोंदणी करावे, असे आवाहन करण्यात आले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर आलेल्या सुट्टीमुळे अनेक अधिकारी अजूनही निवडणूक कामात सहभागी न झाल्याने त्यांना सूचना पत्र पाठवण्यात येत आहे. अत्यंत कडक शब्दांत निवडणुकीसारख्या राष्ट्रीय कामात सहभागी व्हावे, असे या सूचनेत सांगण्यात आले आहे; अन्यथा कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages