महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अशासकीय सदस्यपदी सुधाकर वड्डे व बाबाजी जाधव यांची शासनाने नियुक्ती केली आहे. म्हाडाचा प्रादेशिक घटक असलेल्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अशासकीय सदस्यपदी श्रीरंग देठे, क्लॉईड क्रास्टो, दिलीप राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ च्या कलम १८ च्या अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून मुंबई इमारत दुरुस्ती व पूनर्रचना मंडळाची स्थापना केली होती. या अधिनियमाच्या कलम १८ च्या उपकलमे २, ३, ४ अन्वये शासनाला प्रदान केलेल्या अधिकाराचा आणि त्यास सर्मथ करणार्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
Post Top Ad
10 September 2014
Home
Unlabelled
प्राधिकरणाच्या सदस्यपदी सुधाकर वड्डे, बाबाजी जाधव
प्राधिकरणाच्या सदस्यपदी सुधाकर वड्डे, बाबाजी जाधव
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

