ई टेंडरिंग घोटाळ्याची चौकशी करा - महापौर स्नेहल आंबेकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ई टेंडरिंग घोटाळ्याची चौकशी करा - महापौर स्नेहल आंबेकर

Share This
मुंबई  :  विकास कामे व निविदा प्रक्रियेत पारदर्शकता यावी  यासाठी मुंबई महानगर  पालिकेकडून सुरु करण्यात आलेल्या ई टेंडरिंग मध्ये १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले असून या प्रकरणाची चौकशी  करण्याची मागणी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केली आहे. 

विकासकामे व निविदा प्रक्रियेत ६०० कोटींच्या ई टेंडरिंग मध्ये १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. प्रशासन आणि कंत्राटदरांचे साटेलोटे दक्षता विभागाने उघड केले आहे. यामध्ये २० अभियंत्यांना निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

याबाबत महापौरांशी चर्चा केली असता बुधवारी आयुक्त मुंबई मध्ये येत आहेत . त्यांना बोलावून चर्चा करून  तोडगा काढण्याचा प्रयत्न करू . ई तेन्दारीन्ग्ला आमचा आधी विरोध नव्हता परंतु लोकांची कामे रखडत चालली होती . ई टेंडरिंग द्वारे होणारी कामे सुद्धा निकृष्ट दर्जाची होत चालली होती यामुळे सर्वच नगरसेवकांनी या ई टेंडरिंगला विरोध केला आहे . यामध्ये सर्वच प्रशासनाचे अधिकारी अडकले आहेत. ज्या उद्देशाने हि प्रक्रिया सुरु केली त्याचा फायदा झालेला दिसत नाही. म्हणून आयुक्तांना या घोटाळ्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश आंबेकर यांनी देले आहेत

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages