वीज ग्राहकांची बेस्टकडे नोंद नाही - बेस्टचा अंधाधुंदी कारभार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वीज ग्राहकांची बेस्टकडे नोंद नाही - बेस्टचा अंधाधुंदी कारभार

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव : 
मुंबई महानगर पालिकेचा अंगीकृत उपक्रम असलेला बेस्टमध्ये अंधाधुंदी कारभार सुरु असून बेस्टची वीज कोणत्या ग्राहकांनी वापरली याची बेस्टकडे नोंदच नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते दिलीप गायकवाड यांनी वादाला येथील डॉ बाबा साहेब आंबेडकर  स्थापन केलेल्या सिद्धार्थ वसतिगृहाच्या वीज बिलाबाबत सविस्तर माहिती बेस्ट उपक्रमाकडून मागवली होती. याबाबत माहिती देताना सिद्धार्थ वसतीगृहास १९६४ पासून `` प्रीन्सिपोल डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ `` या नावाने वीज देयकातून वीज बिल थकित असल्याने वीज मीटर काढला असल्याचे सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक ग्राहक सेवा ( एफ /उत्तर ) चे द. के. लंभाते यांनी कळवले आहे.  

परंतु १९६४ साली वसतिगृह आणि १९७२ -७३ मध्ये आंबेडकर कॉलेज सुरु झाले असताना बेस्टने १९६४ पासून आंबेडकर कोलेजच्या प्रीन्सिपोलच्या नावाने वीज आणि वीज बिल कसे दिले. सिद्धार्थ वसतिगृहात १९६५ पासून विद्यर्थ्यांना  बंद केले आहे. या आधी या वसती गृहामध्ये सिद्धार्थ महाविद्यालयातील बुद्धभवन व आनंद भवन मधील विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येत होता. हे होस्टेल पिपल एजुकेशन सोसायटीच्या मालकीचे असताना १९६४ पासून जे कॉलेज अस्तित्वातच नव्हते त्याच्या नावाने बेस्टने वीज बिल कसे दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे यामुळे बेस्टकडे वीज ग्राहकांची खरी माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.      

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages